लाभार्थ्यांना सन्मान पत्र देऊन नवेगावबांध येथे सेवा सप्ताह संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ ऑक्टोबर २०२१

लाभार्थ्यांना सन्मान पत्र देऊन नवेगावबांध येथे सेवा सप्ताह संपन्न

लाभार्थ्यांना सन्मान पत्र देऊन नवेगावबांध येथे सेवा सप्ताह संपन्न

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.२.
भारताचे प्रधानमंत्री नरेश मोदी यांचे जन्मदिनापासून 2आक्टोंबर पर्यंत सेवा सप्ताह निमित्त नवेगावबांध ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक तीन येथील ग्रामपंचायत सदस्य रेशीम काशीवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज 1आक्टोंबरला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली . या प्रसंगी पंचायत समिती प्रमुख खुशाल काशीवार, सामाजिक कार्यकर्ता अशोक हांडेकर, सतीश कोसरकर, शंकर काशिवार, महादेव सिडाम, तुळशीदास कुंभरे, नाजूक राऊत, नीलमचंद्र पंधरे, हिरामण पंधरे, ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश काशीवार, मारोती हांडेकर, शामराव कुंभारे ,हरेश काशीवार, ग्यानबा काशीवार, गणपत काशीवार, साधू रूखमोडे, दिलीप बाळबुद्धे, निताराम मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.