Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, ऑक्टोबर ०३, २०२१

चंद्रपुरातील विमला सायडींगवर करोडो रुपयांचा कोळशाचा काळाबाजार?

चंद्रपुरातील विमला सायडींगवर करोडो रुपयांचा कोळशाचा काळाबाजार?

वेकोली अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे खेळ?News by Khabarbat source

चंद्रपुरातील विमला सायडींगवर करोडो रुपयांच्या कोळशाचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आले. वेकोलीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सर्व खेळ सुरू असून केंद्र व राज्य सरकारच्या डोळयात धूळ फेकून करोडो रुपयांची अफरातफर सुरू आहे. 

Black market of crores of rupees on Vimala siding in Chandrapur? Is the game started with the connivance of Vekoli officials?


वेकोलीच्या मुंगोली पैनगंगा कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळसा ट्रक द्वारे वाहतूक करून एक खासगी प्लॉट असलेल्या विमला सायडींग वर उतरविला जात आहे. तसेच माती व राख मिश्रित कोळसा उद्योगांना विकल्या जात असून चांगल्या दर्जाचा कोळसा हा ब्लॅक मार्केट मध्ये जादा दराने विकल्या जात आहे. वेकोली व संबंधित कंपनीच्या नियमानुसार ज्या कंपनीला कोळसा देण्याचे ठरले असते, त्या कंपनीला डायरेक्ट कोळसा पुरविण्यात यावा असे स्पष्ट लिहिले असताना कोळसा खाणीतून कोळसा उचलून एका खासगी प्लाट वर तो नेल्या जातो. त्यानंतर कोळसा खाणीतून आणलेला चांगल्या दर्जाचा कोळसा बाजूला सारून माती व राख मिश्रित कोळसा कंपनीला पाठविला जातो. आणि इथूनच सारा खेळ सुरू होतो.नियमानुसार ज्या कंपनीला कोळसा देण्याचे ठरले असते त्या कंपनीला डायरेक्ट कोळसा पोहोचविण्याचे काम प्रायव्हेट कंपनीकडे असते. मात्र  मधातच कोळसा उतरवून त्याची हेराफेरी सुरू असल्याची बाब चंद्रपुरातील विमला सायडींगवर सुरू आहे. या सर्व प्रकरणात आता वेकोलीच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी केल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.


Black market of crores of rupees on Vimala siding in Chandrapur? Is the game started with the connivance of Vekoli officials?


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.