नाल्यात बिबट बछडा मृतावस्थेत आढळला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ ऑक्टोबर २०२१

नाल्यात बिबट बछडा मृतावस्थेत आढळला

fILE PHOTOथडीपवनी परिसरात बिबट्याचा मृत्यू

नागपूर दि. 05 : नरखेड वनपरिक्षेत्रातील बानोर नियतक्षेत्र अंतर्गत थडीपवनी ते बानोर रस्त्यालगत असलेल्या नाल्यात बिबट बछडा मृतावस्थेत आढळून आला. या घटनेबाबत वनविभागाचे पथकास कळताच या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मौका पाहणी करून पंचनामा नोंदविण्यात आला आहे. मृत बिबटाचे वय अंदाजे 9 ते 12 महिन्याचे होते.  (#Bibat #calf #found #dead)


बिबट बछड्यचे शरीरर नाल्याच्या पाण्यात बुडलेले असल्याने फुगलेले दिसून आले. त्यामुळे या बिबट बछड्याचे 2 ते 3 दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा, असे प्राथमिक निरीक्षणातून दिसून आले. तसेच मृत बिबटाचे शिर हे शरीरापासून 100 मीटर अंतरावर आढळून आले. या घटनेची माहिती  डॉ. भगत हाडा, उपवनसंरक्षक वनविभाग, नागपूर यांना देण्यात आली. या प्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला असून पि. डी. पालवे सहाय्यक वनसंरक्षक काटोल उपविभाग यांच्या मार्गदशनात संशयित आरोपीकडून पुढील तपास सुरू आहे. मृत बिबटाचे शवविच्छेदन करण्यासाठी ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटर सेमिनेरी हिल्स येथे आणण्यात आले. शवविच्छेदन डॉ. कविता साखरे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशु चिकीत्सालय व डॉ. मयुर काटे, पशुवैद्यकीय अधिकारी ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर, सहाय्यक वनसंरक्षक पी. डी. पालवे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी भिवगडे क्षेत्र सहाय्यक जे. आर. धोंडगे यांच्या उपस्थितीत ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटर सेमिनेरी हिल्स येथे बिबटचा अंत्यविधी करण्यात आला.

#Bibat #calf #found #dead