भामरागड वनअरण्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनतेला आव्हान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२१

भामरागड वनअरण्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनतेला आव्हान

भामरागड वनअरण्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनतेला आव्हानप्रा. डॉ . कैलास वि. निखाडे ,  निसर्ग अभ्यासक  

भामरागड : आपला देश जैवविविधतेने नटलेला आहे. या जैवविविधतेतील वन्यजीव मानवी जीवनाचाही अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांच्या परस्परसंबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती व्हावी, त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, यासाठी १९५४ सालापासून दरवर्षी भारत सरकारच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ’ तर्फे २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारने ‘ इंडियन बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ ’ ची स्थापना पूर्वीच केली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कधी कधी गंभीर रूप धारण करतो. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक कायदे आपल्याकडे आहेतही, पण प्रश्न त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीचा आहे. त्या दृष्टीनेही जनजागृतीची गरज आहे. भारतीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात जनजागृतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही स्वयंसेवी संस्था तसेच सरकारतर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांद्वारे वन्यजीवांचे महत्त्व तरुण पिढीच्या ध्यानात यावे आणि ते वन्यजीव संवर्धनासाठी अधिक सजग व्हावेत, हा प्रयत्न असतो. भामरागड वनअरण्यात वन्यजीवांची सख्या दिवसे ने दिवस कमी होत आहे त्यामुळे लोकामध्ये जनजागृती करून  भामरागड वनअरण्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रा. डॉ . कैलास वि. निखाडे यांनी  जनतेला आव्हान  केले.             


                         Bhamragad Forest Forest Wildlife Sanctuary