डाॅ. खत्री महाविदयालयात बंडू धोतरे यांचे पर्यावरणविषयी मार्गदर्शन | BANDU DHOTRE - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२७ ऑक्टोबर २०२१

डाॅ. खत्री महाविदयालयात बंडू धोतरे यांचे पर्यावरणविषयी मार्गदर्शन | BANDU DHOTRE

 डाॅ. खत्री महाविदयालयात बंडू धोतरे यांचे पर्यावरणविषयी मार्गदर्शन

पर्यावरण संरक्षणात विद्यार्थी व महाविदयालयाची भुमीका महत्वाचीचंद्रपूर: डॉ खत्री महाविद्यालय च्या समाजशास्त्र विभाग तर्फे ‘पर्यावरण-प्रदुषण व त्याचे परिणाम विषयी जाणीव जागृती’ विषयी बंडू धोतरे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ जे एम काकडे, प्राचार्य डाॅ खत्री महाविदयालय, प्रमुख मार्गदर्शक बंडु धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, प्रमुख उपस्थिती डाॅ. एन आर दहेगांवकर, डाॅ. पि एम तेलखडे, नॅक समन्वयक, नितीन रामटेके, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख, प्रा. संतोष कावरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. 

आपल्या मार्गदर्शनात इको-प्रो चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडु धोतरे यांनी विद्यार्थ्यांना, चंद्रपूर जंगलाचा जिल्हा असला तरी येथील औद्योगिकीकरण मुळे प्रदुषणात वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, आरोग्याच्या समस्येत सुध्दा दिवसागणीक वाढ होत आहे. आज आपल्यासमोर निर्माण होत असलेल्या पर्यावरणीय प्रश्न व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आपले योगदान कसे राहील, याचा विचार करून नेहमी कृतीशील उपक्रमात आपला सहभाग निश्चीत करावे. आज चंद्रपूर शहरात पर्यावरणीय समस्या व त्याचे दुष्परीणाम आपण सर्व सहन करतो आहोत. तेव्हा या विरोधात आपली युवाशक्तीनी अधिक व्यापकपणे समाजात जनजागृती करण्याची जवाबदारी आता विद्यार्थ्यांनी आपल्या खांद्यावर घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ जे एम काकडे यांनी "कोरोना काळात आपल्या सभोवतालचे पर्यावरण कसे शुध्द झाले व त्यांचा चांगला परिणाम आपल्याला दिसुन आला. विकासाचा मार्ग स्विकारतांना पर्यावरणाची काळजी घेतली जाणे आवश्यक असुन, आपले सभोवतालचे पर्यावरण संरक्षणाची जवाबदारी ही आपलीच मानुन कार्य करण्याची गरज असल्याचे" मत यावेळी व्यक्त केले.


डॉ खत्री महाविद्यालय च्या समाजशास्त्र विभाग तर्फे आयोजीत या कार्यक्रमाचे प्रास्तावीक डाॅ. पि एम तेलखडे यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन प्रा. कावरे यांनी तर आभार प्रा. रवी वाळके यांनी मानले. यावेळी कार्यक्रमात प्रा. आशिष चहारे, प्रा. माधव गुरनुले, प्रा. सुरेश लोनबले, प्रा. दिलीप बावणे, प्राध्यापिका वंदना वैदय, प्रा. लक्ष्मीनारायण मुत्यलवार इको-प्रो चे सचिन धोतरे, कपील चैधरी व समाजशास्त्र विषयाचे तसेच अन्य विदयार्थी उपस्थित होते.