उद्या कडकडीत नवेगावबांध बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

उद्या कडकडीत नवेगावबांध बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन

 उद्या कडकडीत नवेगावबांध बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन

संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.१० ऑक्टोबर:-

उद्या दिनांक ११ ऑक्टोंबर रोज सोमवारला  राज्यातील महा विकास आघाडीने पुकारलेल्या  महाराष्ट्र बंदला समर्थन देण्यासाठी उद्या नवेगावबांध बंद ला व्यापारी प्रतिष्ठाने व जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन स्थानिक महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्ष नेत्यांनी केले आहे. या आंदोलनात स्थानिक जनतेला व व्यापारी प्रतिष्ठान यांना सहभागी करून घेण्यासाठी विचार विमर्श करण्यासाठी नवेगावबांध येथील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी पक्ष नेत्यांची आज तातडीची सभा येथे घेण्यात आली. यात नितीन पुगलिया, संतोष नरुले, बबलू शिपानी, कमलकिशोर जयस्वाल, जगदीश पवार ,परेश उजवणे रत्नदीप दहिवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तरोने, शिवसेना गोंदिया जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, होमराज गाहणे, बंटी गुप्ता, मोटाभाई, पोवळे यांच्या उपस्थितीत येथे सभा घेण्यात आली . गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावे.  आणि महाराष्ट्र  कडकडीत बंद पाळण्यात यावा . लखिमपुर घटनेचा निषेध करावा. असे महाविकास आघाडी पक्ष नेत्यांनी नागरिकांना व व्यापारी प्रतिष्ठानांना यावेळी विनंती केली आहे.