10 दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार करून अवयवाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक:मोठे मासे लागणार गळाला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ ऑक्टोबर २०२१

10 दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार करून अवयवाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक:मोठे मासे लागणार गळालाचंद्रपूर/प्रतिनिधी:
10 दिवसाच्या वाघाच्या बचड्यांचा अवयवांची तस्करी करणाऱ्या उर्जानगर येथील मसाला गावातील कालिदास मारोती रायपूरे व चीचबोडी येथील लोमेश दबले याना चंद्रपूर वनविभागाच्या पाठकाने रंगेहाथ अटक केली आहे. सावली येथील जंगलातून 10 दिवसाच्या वाघच्या बछड्याची शिकार करण्यात आली होती. त्यानंतर त्याचंद अवयव विक्री साठी नेण्यात येणार असल्याची गोपनिय माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर गेले 10 दिवस सतत त्या मार्गावर राहुन वनविभागाचे पथक कार्यरत होते. दिनांक 06/10/2021ला एम. आय. डी. सी. बुटीबोरी येथे विक्री व्यवहार करनार असल्याची माहिती प्राप्त झाली व त्यानुसार सापळा रचन्यात आला. मात्र आरोपी कालिदास रायपुरे यांनी मौजा पडोली जिल्हा चंद्रपुर येथे व्यवहार करणार असल्याचे सांगितले त्यानुसार श्री. अरुण गादेवार वनक्षेत्रपाल ( दक्षता पथक ) चंद्रपुर यांचेशी संपर्क साधुन त्यांना पथकात शामिल करुण वाघ बछडा शरीरासह दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. मागील वाघाचे अवयव तस्करी प्रकरणात काही धागे-दोरे आहेत का? याबाबतची तपास सुरु आहे.

या धडीत डॉ. भरत सिंग हाडा, उपवनसंरक्षक नागपुर व श्री अरविंद मुंडे, उपवनसंरक्षक चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात श्री, एन. जी. चांदेवार, सहायक वनसंरक्षक जंकास-2, एल. व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, अरुण गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (दक्षता पथक ) चंद्रपुर, श्री टवले, श्री शेंडे, श्री जाधव, श्री कुल्लरकर वनरक्षक यांनी धाड यशस्वी केली. पुढील तपास श्री. एन. जी. चांदेवार सहायक वनसंरक्षक जंकास-2, उपविभाग उमरेड हे करित आहेत.