चंद्रपूर मनपातील फायरब्रिगेड विभागाच्या अधिकाऱ्यांची पोलिसात दखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

चंद्रपूर मनपातील फायरब्रिगेड विभागाच्या अधिकाऱ्यांची पोलिसात दखलचंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर महानगरपालिकेतील फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याने पोलिसाला मनस्ताप होईल असे उत्तर दिल्याने पोलीस विभागाकडून चक्क अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याची तक्रारीची दखल GDD डायरीत केली.

सोमवारी काँग्रेस व इतर मित्रपक्षांने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.याच बंदच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंद्रपूर पोलीस विभागाकडून शहरातील महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन दलाला पूर्वसूचना देण्यात आली. रविवार असल्यामुळे महापालिका बंद असते आणि त्यामुळे पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. मात्र पोलिसांकडून फोनवर संबंधित अधिकाऱ्याला तशी माहिती देण्यात आली होती. मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी चैतन्य चवरे यांनी पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्याला कॉन्स्टेबल बोलतील म्हणून आम्ही फायर ब्रिगेड पाठवायची का?असा प्रश्न करत तुमचे डीवायएसपीना माझ्याशी बोलायला लावा असे म्हणत वाद घातला.

यानंतर पोलीस विभागाकडून देखील चवरे यांच्या विरोधात पोलिसात असलेल्या GDD डायरीत दखल नोंद करण्यात आली. त्यामुळे एका शासकीय विभागातील अधिकारी दुसऱ्या शासकीय आणि जिम्मेदार विभागाच्या सूचनांना तिलांजली देत अधिकाऱ्याला बोलायला लावा असं जर म्हणत असेल, तर मात्र हे महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे जर जबाबदार अधिकारी पोलिसांसोबत जर असा वाद घालत असेल तर मग सामान्यांच्या म्हणण्यावरून अग्निशमन विभाग हे ॲक्टिव होऊन घटनास्थळी पोहचणार का? की आणखी कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याच्या फोनची वाट बघणार,हे मात्र ती वेळच सांगेल.