Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

रविवारी 61 केंद्रावर युपीएससी पूर्व परिक्षारविवारी नागपुरात 61 केंद्रावर युपीएससी पूर्व परिक्षा

परीक्षा सुरु होण्यापूर्वीच प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन


नागपूर, दि. 08 : संघ लोक सेवा आयोग नवी दिल्ली मार्फत आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ रविवारी 10 ऑक्टोबर रोजी नागपुरातील 61 उपकेंद्रावर होणार आहे. यासाठी परीक्षार्थींनी किमान दहा मिनिट पूर्वी आपल्या जागेवर स्थानापन्न होणे गरजेचे आहे. तसेच आयोगाने निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करत वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश निश्चित करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे जिल्हा प्रशासनाने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज जारी केलेल्या पत्रकात आवाहन केले आहे. संघ लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या या परीक्षेला नागपूर येथील 61 केंद्रावर 22 हजार 774 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या परीक्षेला दोन सत्रांमध्ये घेतले जाणार आहे. प्रथम सत्रकरिता सकाळी 9:20 वाजेपर्यंत तर द्वितीय सत्र करिता दुपारी 2:20 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षार्थीने प्रवेश पत्रावरील माहिती काळजीपूर्वक वाचून सर्व सुचनांचे पालन काटेकोरपणे गरजेचे आहे. कोणत्याही सबबीमुळे उमेदवारास अतिरिक्त वेळ मर्यादा वाढवून देण्यात येणार नाही. तसेच परीक्षार्थीस परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्राकरिता 9:20 नंतर व दुपारच्या सत्रात करिता दुपारी 2:20 नंतर प्रवेश देणार येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव बघता परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर मास्क लावूनच प्रवेश देण्यात येणार आहे. तद्वतच परीक्षार्थीने त्यांच्यासोबत हॅन्ड सॅनिटायझर बाळगावे, कोविड -19 च्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याचे आव्हानही जिल्हाधिऱ्यांनी केले आहे. परीक्षार्थींनी कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, आयपॅड इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रामध्ये आणू नये, नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोक हेदेखील ‍व‍िचारतातSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.