शाळांना सुट्ट्या जाहीर | 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुटी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ ऑक्टोबर २०२१

शाळांना सुट्ट्या जाहीर | 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुटी

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टाेबरपासून सुरु झाल्या होत्या. मात्र, दिवाळीनिमित्त राज्य सरकारने शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुटी जाहीर केलीय. कोविडमुळे अनेक दिवस वाया गेल्याने सुट्यांचा कालावधी कमी करण्यात आलाय. State Education school 

राज्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर न झाल्याने विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कोरोनामुळे अनेकांना प्रवास करता आलेली नव्हता. राज्यात बऱ्यापैकी अनलाॅक झाले असले, तरी सुट्या जाहीर होत नसल्याने अनेकांना प्रवासाचे नियोजन करता येत नव्हते.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीच्या सुटीबाबत ट्विट करुन माहिती दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी असेल. या काळात ऑनलाइन अध्यापनही बंद राहणार आहे.
State Education school