खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेशाची मुदत 22 ऑक्टोबरपर्यंत | RTE - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ ऑक्टोबर २०२१

खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेशाची मुदत 22 ऑक्टोबरपर्यंत | RTE
नागपूर दि. 18 : कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित पूर्णत: खासगी असणाऱ्या नामांकित शाळांमध्ये अल्पसंख्यांक शिक्षण संस्था, शाळा वगळून 25 टक्के राखीव जागांसाठी 2021-22 या वर्षासाठी बालकांची प्रवेश प्रक्रीया (
 RTE) 12 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पालकांना प्रतिक्षा यादीतील प्रवेश बालकांच्या प्रवेशासाठी 22 ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधता येईल.

प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाबाबत एचटीटीपीएस कोलन हॅश स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट देवून आरटीई (
 RTE) पोर्टलला अप्लीकेशन वाईस डिटिएल्स या पर्यायाचा वापर करून माहिती मिळविता येईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत सोबत आणू नये. आरटीई प्रवेश प्रक्रीया राबवितांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे. तरी सर्व शाळा, पालक व सामाजिक संस्था यांनी मुदतवाढीकडे लक्ष वेधावे व दखल घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक, चिंतामन वंजारी यांनी कळविले आहे.

 RTE | Deadline for admission in private school under RTE