Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान आधुनिक शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण |


#Goat #Poultry #DairyFarming

नागपूर दि. 07 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण (#Goat #Poultry #DairyFarming) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘एमसीईडी’चे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत शेळी, कोंबडी व गाई-म्हशीच्या जातीची निवड, त्यांना होणारे रोग व लसीकरण, शेडचे बांधकाम, पोषक तत्वे, चारा व्यवस्थापन, विमा व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी तसेच प्रकल्प भेट इत्यादी विषयांवर प्रशिक्षण व स्वयंरोजगार सुरू करणे, कर्ज विषयक योजनांची माहिती, विक्री व्यवस्थापन प्रकल्प माहिती अहवाल आदी विषयांची माहिती दिली जाईल.

इच्छुक प्रशिक्षणार्थींनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी एम.सी.ई.डी, उद्योग भवन, पहिला माळा, सिव्हील लाईन, नागपर येथे अश्विनी शेंडे (भ्रमणध्वनी क्र. 7498769824), श्रीकांत कुळकणी (भ्रमणध्वनी क्र. 9403078760) यांच्याशी 19 ऑक्टोबरपूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

#Goat #Poultry #DairyFarming

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.