18 ते 22 ऑक्टोबर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन online Melawa Rojgar - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ ऑक्टोबर २०२१

18 ते 22 ऑक्टोबर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन online Melawa Rojgar

चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या वतीने दिनांक 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे (online Melawa Rojgar) आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे यांनी केले आहे.

ही असणार ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती:

www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधुन महास्वयम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंट वर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर-3 या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आय अॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.

सर्व उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करून दि. 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदाकरिता उद्योगांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हाट्सअप (whatsapp), गुगल मिट (Google Meet) , व्हिडीओ कॉलींग इत्यादींच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे कळविण्यात आले आहे.