संजय गांधी निराधार योजनेचे 114 प्रकरण मंजूर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ ऑक्टोबर २०२१

संजय गांधी निराधार योजनेचे 114 प्रकरण मंजूर

 
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
               :-संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रकरण निकाली काढण्यासाठी नुकतीच तहसील कार्यालय भद्रावती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही योजनेतील जवळपास 114 प्रकरण मंजूर करण्यात आले.
 तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत डॉ. नितेश खटके तहसीलदार, भांदककर नायब तहसीलदार, प्रशांत काळे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, सुरज गावंडे शहर अध्यक्ष काँग्रेस, चंदू दानव, वर्षा ठाकरे, आशिष ठेंगने, अशोक ताजणे, आदी उपस्थित होते.  या बैठकीत विविध योजनेबाबत लाभार्थ्याचे त्रृटी व विविध विषयावर चर्चा करण्यात आली यात संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 87 प्रकरणे व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे 27 असे एकूण 114 प्रकरण मंजूर करण्यात आले.