सर्प दंशाने महिलेचा मृत्यू । सावली तालुक्यातील घटना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ सप्टेंबर २०२१

सर्प दंशाने महिलेचा मृत्यू । सावली तालुक्यातील घटना

निफन्द्रा/प्रतिनिधी
सावली तालुक्यातील पारडी येथे शेतात काम करीत असताना सर्पदंशाने महिलेचा म्रुत्यु झाल्याची घटना (दि.28) रोजी दुपारच्या सुमारास घडली. रेखाबाई कालिदास चरडूके (40) असे म्रुतक महिलेचे नाव आहे.
सध्या शेतीच्या आंतर मशगतीची कामे सुरू आहेत. सदर महिला ही शेतातील काम करण्यास गेली होती. काम करीत असतानाच पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने सदर महिला शेतात चक्कर येऊन पडली. आजूबाजूच्या शेतकऱ्यानी महिलेला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. परंतु उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला. सदर महिलेच्या म्रुत्यु मुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.