लसीकरणाला सिरीजचा तुडवडा डॉ. गजानन डोंगरवार यांनी दिल्या आरोग्य वर्धिनी केंद्राला २०० सिरीज भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ सप्टेंबर २०२१

लसीकरणाला सिरीजचा तुडवडा डॉ. गजानन डोंगरवार यांनी दिल्या आरोग्य वर्धिनी केंद्राला २०० सिरीज भेट

लसीकरणाला सिरीजचा तुडवडा

डॉ. गजानन डोंगरवार यांनी दिल्या आरोग्य वर्धिनी केंद्राला २०० सिरीज भेट

संजीव बडोले प्रतिनिधी


नवेगावबांध ता25 सप्टेंबर:-

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. परंतु लसीकरणासाठी आवश्यक सिरीज चा तुटवडा पडला असल्यामुळे, कितेक आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरण कार्यात मोठा अडथळा येत आहे.काही ठिकाणी लसीकरण कार्य थांबविण्यात आले आहे. नागरिकांच्या मनातली भीती दूर झाल्यामुळे, स्वतःहून लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. ग्रामीण भागात मात्र सिरीज अभावी नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.सिरीज तुटवड्याची ही बाब डॉ. स्वेता कुलकर्णी यांनी  भारतीय जनता पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन डोंगरवार यांच्या लक्षात आणून दिली. ग्रामीण भागातील लसीकरण कार्य थांबू नये, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र चांन्ना बाकटीला स्वतः खाजगीरित्या डॉ. डोंगरवार यांनी आज दि.२४ सप्टेंबर रोज शुक्रवार ला २०० सिरीज भेट म्हणून दिल्यात. प्राप्त झालेल्या या सिरीज चा उपयोग आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पिंपळगाव आणि आरोग्यवर्धिनी केंद्र चांन्ना येथे कोविड लसीकरणासाठी  करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता कुलकर्णी यांनी दिली आहे आहे.लसीकरण कार्याला आरोग्य सेविका भोयर,भूमाली,सीमा,मलेरिया वर्कर शहारे यांनी सहकार्य केले.