फुटबॉल खेळतांना वीज कोसळून दोन युवक ठार | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० सप्टेंबर २०२१

फुटबॉल खेळतांना वीज कोसळून दोन युवक ठार |

 वीज कोसळून दोन युवक ठार; तर एक गंभीर जखमी

फुटबॉल खेळतांना चनकापूर मैदानात घडली घटना

चनकापूर परिसरात सर्वत्र शोककळा


खापरखेडा-प्रतिनिधी

फुटबॉल खेळणाऱ्या दोन युवकांवर काळाने झडप घेतली असून मुसळधार पावसात वीज कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत १० सप्टेंबर शुक्रवारला दुपारच्या सुमारास  घडली तर एक १३ वर्षीय बालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने थोडक्यात बचावला  त्यामूळे चनकापूर परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहिती नुसार तन्मय सुनील  दहिकर वय १७ रा लोनखैरी ह.मु चनकापूर वसाहत व अनुज कुशवाह वय २१ रा चनकापूर असे मृतक युवकांची नावे असून सक्षम सुमित गोटीफोडे वय १३ रा पाचपावली नागपूर असे गंभीर जखम बालकाचे नाव आहे.

स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत वेकोलीच्या अखत्यारित असलेले चनकापूर परिसरात मोठे खेळाचे मैदान आहे याठिकाणी दररोज शेकडो तरुण, तरुणी खेळाडू याठिकाणी सराव करण्यासाठी येतात शिवाय मोठया संख्येने नागरिक मॉर्निंग व इविनिग वाक साठी येतात.

घटनेच्या दिवशी १० सप्टेंबर रोज शुक्रवारला दुपारी ४.३० च्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली यावेळी मृतक तन्मय, अनुज, जखमी सक्षम यांच्यासह अनेक खेळाडू फुटबॉल खेळत होते फुटबॉल खेळत असतांना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली सदर घटनेत तन्मय व अनुजचा घटनास्थळी मृत्यू झाला तर सक्षम गंभीर जखमी झाला.सदर घटनेची माहिती चनकापूर खापरखेडा परिसरात वाऱ्या सारखी पसरली पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी यांनी खापरखेडा पोलीसांना माहिती देऊन रुग्णवाहिका उपलब्ध दिली त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविले मात्र तन्मय व अनुजला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले तर शासकीय मेयो रुग्णालयात सक्षमवर उपचार सुरू आहे याप्रकरणी खापरखेडा पोलीसांनी नोंद केली आहे.


मृतक तन्मय व अनुज महाविद्यालयीन विद्यार्थी

मृतक तन्मय हा मूळचा कोराडी परिसरात असलेल्या लोणखैरी या गावात राहणारा आहे तन्मय महाराष्ट्र विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा येथील विद्यार्थी आहे तो विज्ञान शाखेत वर्ग १२ शिकत होता त्याला गावाला जाने येने परवडत नसल्यामूळे तो चनकापूर वसाहतीत चंद्रमोहन फसाटे यांच्याकडे आपल्या मावशीच्या घरी राहत राहत होता.तर मृतक अनुज महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली असून त्याचे वडील सिल्लेवाडा कोळसा खाणीत कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.


सक्षम चार महिण्या पूर्वीच आजोबाकडे राहायला आला होता

 सक्षम गोटीखोडे हा पाचपावली नागपूर येथील राहणारा असून चनकापूर वसाहतीत राहणारे  आजोबा मिलिंद ढोरे यांच्याकडे चार महिन्यापूर्वी राहायला आला होता मृतक तन्मय, अनुज व गंभीर जखमी सक्षम दररोज चनकापूर मैदानात फुटबॉल खेळण्यासाठी जात होते मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते मुसळधार पावसात वीज कोसळलेल्या घटनेत तन्मय व अनुजचा मृत्यू झाला तर सक्षम गंभीर झाला.Two youths were killed in a lightning strike while playing football