आदिवासी महिलेला बेदम मारहाण महिला पडली मुर्चीत | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ सप्टेंबर २०२१

आदिवासी महिलेला बेदम मारहाण महिला पडली मुर्चीत |

Tribal woman beaten Sondo in Rajura taluka Chandrapur

राजुरा तालुक्यातील सोंडो येथील घटना 

राजुरा / प्रतिनिधी 

राजुरा तालुक्यातील सोंडो येथे मजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या आदिवासी महिला तांदूळ आणण्यासाठी जात असताना सार्वजनिक ठिकाणी सत्यपाल उडनुलवार वय 45 वर्ष या व्यक्तीनी मी तांदूळ देतो माझ्या सोबत झोप असे बोलल्याने आदिवासी महिला त्याला शिवी दिली असता सदर इसमाने मनात राग ठेवून दिनांक ४/९/२०२१ ला शेतात जात असताना सत्यपाल उडनुलवार अनिता उडनुलवार वय 35 , जयपाल उडतूलवार वय ४० वर्ष, वासुदेव झिट्टापेनावार वय 55 वर्ष, गंगुबाई झिट्टापेनावार वय 50 वर्ष, सरिता झिट्टापेनावार वय २५ वर्ष यांनी संगनमत करून बेदम मारहाण केली असून सदर आदिवासी महिला मारहाणीमुळे मुर्चीत पडली. असून जबर मार असल्याने चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णल्यात दिनांक ६/९/२०२१ ला भरती करण्यात आले असून आरोपींच्या विरोधात दिनांक ४/९/२०२१ ला पिढीत महिलेने पोलीस स्टेशन विरुर (स्टे.) येथे  तक्रार नोंदविली आहे. मात्र आरोपी अजूनही मोकाट असून पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Tribal woman beaten Sondo in Rajura taluka Chandrapur