मेहा बुजरूक येथे वाघाच्या हल्य्यात तरुण जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ सप्टेंबर २०२१

मेहा बुजरूक येथे वाघाच्या हल्य्यात तरुण जखमी

सावली तालुक्यातील मेहा बुजरूक येथे वाघाच्या हल्य्यात तरुण जखमी झाला. सुनील देविदास चाफले वय ३० वर्ष असे तरुणाचे नाव आहे. पाथरी रोडवरील नवीन गाव तलावाजवळ घरची जनावरे राखत असताना झुडपात लपून बसलेल्या वाघाने पाठीमागून हल्ला केला. यात सुनीलच्या पाठीवर वाघाच्या पंजाचे नख रुतल्याने दुखापत झाली. घटना समजताच गावकऱ्यांनी सुनीलला अंतरंगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती केले.