विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ सप्टेंबर २०२१

विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या


शिरीष उगे (भद्रावती / प्रतिनिधी)
:- तालुक्यातील चंदनखेडा येथे राहणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. माणिक सदाशिव बागेसर वय 50 राहणार चंदनखेडा असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे गेल्या दोन दिवसापासून माणिक घरून बेपत्ता होता याचा शोध चालू असताना त्याचे शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगत असताना दिसला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आत्महत्येचे कारण कळू शकले नाही पुढील तपास ठाणेदार भारती यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.