दोन हजारांची लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सापडला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१६ सप्टेंबर २०२१

दोन हजारांची लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सापडला

 दोन हजारांची लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सापडला 

आशिष शिंदेला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली रंगेहाथ अटकचंद्रपूर -  पंचायत समिती जिवती , जि . चंद्रपूर येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ( कंत्राटी ) आशिष उत्तमराव शिंदे , वय ३० वर्षे , पंचायत समिती जिवती जि . चंद्रपूर यांनी २,००० / - रूपयांची लाच स्विकारल्याने त्यांचेविरूध्द अॅन्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे . 


तक्राररदार हे घोडाअर्जुनी ता . जिवती , जि . चंद्रपूर येथील रहीवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात . तक्रारदार यांचे वडील व आजोबा यांच्या नावाने असलेल्या घराच्या बांधकामाकरीता पंतप्रधान आवास योजना अंतर्गत प्रत्येकी १,४८,००० / - रूपये असे एकुण २ , ९ ६,००० / - रूपये मंजुर झालेले होते . त्यानुसार घराचे बांधकामाचा तिसरा टप्पा पुर्ण झाल्याने तिसऱ्या टप्प्यांतर्गत मिळणारे प्रत्येकी ४५,००० / - रूपये असे एकुण ९ ०,००० / - रूपये मिळण्याकरीता पंचायत समिती जिवती येथे बील सादर केले होते . त्यानुसार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिंदे हे बांधकाम पुर्ण झाले किंवा कसे याबाबत शहानिषा करण्याकरीता तकारदार यांचे राहते घरी धोडाअर्जुनी येथे दिनांक १४ / ० ९ / २०२१ रोजी गेले होते . त्यांनी घराचे बांधकामाचे पाहाणी केली तेव्हा तकारदार यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिंदे यांना घराचे तिसऱ्या टण्यातील बांधकाम पुर्ण झाले असुन तिसऱ्या टप्यातील रक्कम मंजुर करून देण्याबाबत म्हटले असता , ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिदे यांनी “ तुला तिसऱ्या टप्प्याची रक्कम लवकरात लवकर पाहिजे असेल तर मला दोन्ही घराचे कामाकरीता एक - एक हजार रूपये असे एकुण २,००० / -रू दयावे लागेल , तेव्हाच तुझे बिल मंजुर होईल अन्यथा होणार नाही . " असे म्हणुन तकारदार यांना २,००० / - रूपये लाच रक्कमेची मागणी केली . परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.


तक्रारदाराने दिलेल्या तकारीची पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे यांनी अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले . त्यामध्ये दिनांक १६ / ० ९ / २०२१ रोजी पडताळणी दरम्यान ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिंदे यांनी तक्रारदार यांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घराच्या बांधकामाकरीता तिसऱ्या टप्प्यातील रक्कम मंजुर करून देण्याकरिता २,००० / - रु . लाचेची मागणी करून २,००० / -रू लाच रक्कम कार्यालय पंचायत समिती जिवती , जि . चंद्रपूर येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात पकडले . त्यावरून आरोपी विरूध्द् पोलीस स्टेशन जिवती जि . चंद्रपूर येथे गुन्हा दाखल केला आहे . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अप्पर पोलीस अधिक्षक श्री . मिलींद तोतरे , ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उपअधिक्षक श्री.अविनाश भामरे , ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे , पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ . संतोष येलपूलवार , रोशन चांदेकर , संदेश वाघमारे , म.पो. शि . समिक्षा भोंगळे , चापोशि . सतीश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूर हे करीत आहेत .

A rural housing engineer was found taking a bribe of Rs 2,000