पंडीत लोंढे "झाडी शब्द साधक शिक्षक पुरस्काराने" सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ सप्टेंबर २०२१

पंडीत लोंढे "झाडी शब्द साधक शिक्षक पुरस्काराने" सन्मानितशिरीष उगे वरोरा/प्रतिनिधी
:- शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील बळाबरोबर साहित्य क्षेत्रात लेखनीच्या किमयेत उतरत असल्याचा साहित्य क्षेत्राचा दृष्टीकोनाचा प्रत्यय श्री पंडीत लोंढे यांच्या गौरवाने झाला.

वरोरा येथील शिक्षक पंडीत लोंढे, वरोरा झाडीबोली साहित्य मंडळाचे सदस्य असून त्यांनी आपल्या शैक्षणिक सेवेतील यशाबरोबर साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला. त्यांना ५ सप्टे.२०२१ शिक्षक दिनाचे औचित्यावर "झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर (ग्रामिण) द्वारा पंचायत समिती मुल येथील सभागृहात "शब्द साधक शिक्षक पुरस्कार २०२१" ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी केंद्रिय निवड समितीने केली. झाडीबोलीचे संवर्धन करण्यासाठी आपल्या लेखणीने स्वतःला व बोलीला सिद्ध करित असल्याचा हा गौरव आहे.
त्यासाठी त्यांना हा पुरस्कार व डाँ.गुरुप्रसाद पाखमोडे नामवंत साहित्यिक तथा अभ्यासक मंडळ अध्यक्ष रा.तु.म.विद्यापीठ नागपूर, रत्नमालाताई भोयर नगराध्यक्षा, चंदू मारगोनवार सभापती पं.स.मुल, बंडोपंत बोढेकर कें.झा.सा.मं.सदस्य, खडसे साहेब बि.डी.ओ.मुल, विजय भोगेकर शिक्षक नेते, अरुण झगडकर अध्यक्ष झा.सा.मंडळ चंद्रपूर(ग्रा.)यांचे प्रमुख उपस्थितीत शुभहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील साहित्यप्रेमी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे औचित्य होते,मुल येथील सन्मा.मा.लक्ष्मण खोब्रागडे सर लिखित "मोरगाड" या अस्सल झाडीबोलीतील काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा.
पंडीत लोंढे यांचे साहित्तीक चळवळीतील योगदान त्यांचे गद्य व पद्य लेखन अनेक वृत्तपत्रे मासिकातून प्रसिद्ध झाले असून त्यांनी झाडीबोली चे संवर्धन व जतन करण्यासाठी त्यांचे लेखन सातत्याने सुरु आहे.
त्यांना मिळालेल्या सन्मानाने साहित्य क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.