पोपटपंची काँग्रेसची परंपरा भाजपचे काम बोलते:अविनाश ठाकरे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ सप्टेंबर २०२१

पोपटपंची काँग्रेसची परंपरा भाजपचे काम बोलते:अविनाश ठाकरे


नागपूर/
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या प्रेस नोटच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर पोपटपंची  करतात असा आरोप केला परंतु मी आठवण करून देऊ इच्छितो कि पोपटपंची हि भाजपाची  संस्कृती नसून काँग्रेस ची परंपरा आहे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष यांनी मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढतांना निवडणूक हारल्यास राजकीय सन्यास घेईल असे जाहीर वक्तव्य केले होते.

 ऊर्जा मंत्री यांनी कोरोनाच्या काळातील इलेक्ट्रिक बिल माफ करू असे वक्तव्य केले. होते, ओबीसी मंत्री यांनी ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्याकरिता एक महिन्यात इम्पेरिकल डाटा गोळा करू असे वक्तव्य केले होते. सर्व वक्तव्य पोपटा सारखे पंछी बनुन हवेत उडून गेले. भारतीय जनता पार्टी ने गेल्या १५ वर्षात जे आश्वासन दिले त्यातील बहुतांश प्रकल्प पूर्णत्वास नेले.

काँग्रेस पक्षात समन्वय नसल्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मा. काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी केलेले खोटे आरोप जर का काँग्रेस अध्यक्ष यांचा महानगर पालिकेतील विरोधी पक्ष नेत्या सोबत समन्वय असता तर त्यांना विधानसभा निहाय दवाखाने,स्कॅनिया इथेनॉल वर चालणारी बस,गांधी सागर तलाव,सक्करदरा तलाव ,सोनेगाव तलाव,स्मार्ट प्रकल्पा चे टेंडर व होमी स्वीट होम स्वीट होम प्रकल्प,पर्यावरण पूरक स्मशानभूमी या सुरु असलेल्या प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता भासली नसती. मा. काँग्रेस अध्यक्षांचे त्यांच्या कार्यकर्त्याकडे जाणे इतक्यात कमी झालेले दिसत आहे.

 त्यांचे  कार्यकर्त्यांकडे जाणे सुरु असते तर त्यांच्या ९० टकके कार्यकर्त्यांकडे त्यांना नागपूर महानगर पालिकेच्या २४ बाय ७ योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याचा चहा प्यायला मिळाला असता आणि किती वर्षांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा काढायची संधी मिळत नाही याची माहिती देखील मिळाली असती. त्यांच्या घराजवळील फुटाळा तलावाला त्यांनी इतक्यात फेरफटका मारला असता तरी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे फाउंटन त्या ठिकाणी होत आहे याची माहिती मिळाली असती. इतक्यात मा. काँग्रेस अध्यक्ष कोणत्याही सरकारी उदघाटनाच्या कार्यक्रमात दिसत नाही समजा ते सरकारी उद्घटनाच्या कार्यक्रमात गेले असते तर नागनदी पुनर्जीवन आणि सिवरेज प्रकल्प साठी केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची जी माहिती मा. केंद्रीय  मंत्री नितीनजी गडकरी यांनी जाहीर सभेतून सार्वजिनिक केली हे देखील कळले असते. 

मा. काँग्रेस शहर अध्यक्ष शिवसेना प्रणित महाविकास आघाडी चे आमदार असून देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक च्या जागेचा  वाद कोर्टात आहे याची माहिती त्यांना असू नये हि आश्चर्याची बाब आहे.
काँग्रेस ला नागपूर च्या विकासासोबत काहीही देण घेणं नसुन निवडणुका आल्यावर बेछूट खोटेनाटे आरोप करणे हाच उद्योग आहे.

 जर त्यांचा नागपूर शहराचा विकास व्हावा असा मानस असता तर त्यांनी मा. महापौर यांचे सोबत चर्चा करून नाईक तलाव,पांढराबोडी तलाव,जुना भंडारा रोड रुंदीकरण , बुधवार बाजार, सक्करदरा बाजार या प्रकल्पासाठी माजी मुख्यामंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या काळात मंजूर झालेला  निधी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून अजून प्राप्त झाला नाही तो निधी प्राप्त करून देऊन हे प्रकल्प सुरु करण्यास हातभार लावता आला असता. परंतु जे या नगरीचे महापौर होते, मनपाचे विरोधी पक्ष नेता होते त्या काँग्रेस च्या शहर अध्यक्षांना लंडन स्ट्रीट आणि ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प एकच आहे., हे सुद्धा माहित नसेल त्या काँग्रेस अध्यक्षां कडून आम्हला कोणत्याही सहकार्याची अपेक्षा नाही. 

आदरणीय  केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात झलेला विकास या शहरातील जनतेच्या समोर आहे त्यामुळे काँग्रेस ने उपस्थित केलेल्या मुद्यांना जनताच येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.