#MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेसंदर्भात दबाव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० सप्टेंबर २०२१

#MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेसंदर्भात दबाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेसंदर्भात विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणांच्या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑक्टोबर 2021 मध्ये स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. सदर जाहिरातींस अनुसरून अर्ज करणे सुलभ व्हावे; याकरिता अद्याप खाते अद्ययावत न केलेल्या उमेदवारांनी त्यांची खाती लवकरात लवकर अद्ययावत करावीत. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतींकरीता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार 2020 व तदनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियांपासून अगोदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बहुसंवर्गिय पदांच्या भरती करिता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल. बहुसंवर्गिय पदांच्या भरतीप्रक्रिया वगळता अन्य भरतीप्रक्रियांकरिता गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल.