चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने काय फरक जाणवतो? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१७ सप्टेंबर २०२१

चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने काय फरक जाणवतो?

कच्चे दूध हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते. तसंच तर कच्च्या दुधाचे बरेच फायदे आहेत. मात्र, आपली त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी कच्चे दूध अधिक फायदेशीर ठरते. कच्चे दूध हे चेहऱ्याची नैसर्गिक चमक तशीच राखण्यास मदत करते. कच्च्या दुधात आढळणारे तत्व त्वचा अधिक तजेलदार बनविण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. तसंच चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या काढण्यासाठी आणि त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी कच्चे दूध खूपच फायदेशीर ठरते. तुम्हालाही मुलायम आणि डागविरहित त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी कच्च्या दुधाचा वापर करू शकता.

मुलायम त्वचा होती

चेहरा उजळ होतो

चेहऱ्याचां तेलकट पना कमी होतो,

चेहऱ्याची त्वचा घट्ट होते

चेहरा साफ करण्यासाठी कच्चे दूध महत्वाचे कार्य करते


चेहऱा सुंदर बनवण्यासाठी मुली काय करत नाहीत. महागातील महाग उत्पादनांचा वापर केला जातो. आठवड्यातून दोनवेळा पार्लरला जातात. मात्र ही केमिकल उत्पादने तुमच्या चेहऱ्यासाठी नुकसानकारक असतात. तुमच्या चेहरा सुंदर बनवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्वे असतात. 

हे आहेत याचे फायदे

याचा टोनर म्हणून तेलकट त्वचेसाठी उपयोग होऊ शकतो. यासाठी थोड्याश्या कच्च्या दुधात काही थेंब लिंबाचे रस मिसळा. या मिश्रणाला चेहरा आणि मानेला लावा आणि काही वेळाने गरम पाण्याने चेहरा धुवा. 

त्वचा साफ करण्यासाठीही तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. यासाठी दुधात थोडेसे मध मिसळून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.