Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

'INTERNET BLACKOUT' | 30 सप्टेंबरला जगभरात इंटरनेट सेवा बंद होण्याची शक्यता

 'INTERNET BLACKOUT' | 30 सप्टेंबरला जगभरात इंटरनेट सेवा बंद होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबरपासून लाखो संगणक, मोबाईल उपकरणे इत्यादींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध होणार नाही.30 सप्टेंबरला 2021 ला अनेक डिव्हाईसेसमधील IdentTrust DST Root CA X3 सर्टिफिकेट एक्सपायर होणार आहे. हे सर्टिफिकेट दोन डिव्हाईसमधील कन्केशन सुरक्षित करते. या सर्टिफिकेटमुळे तुम्ही वापरत असलेले डिव्हाईस आणि वर्ल्ड वाइड वेब (WWW) यामध्ये होणारा डेटा ट्रान्फर करताना चोरी होत नाही. 


सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण जेव्हा कोणतेही वेबपेज सुरू करतो तेव्हा त्याच्या सुरूवातीला HTTPS दिसते. याचा अर्थ असा होतो की, ही लिंक सुरक्षित आहे. या लिंकसाठी  IdentTrust DST Root CA X3 सर्टिफिकेट देण्यात आले आहे, असा त्याचा अर्थ होता. आता प्रश्न  असा आहे की, सगळ्याच डिव्हाईसमधीस हे सर्टिफिकेट एक्सपायर होणार की फक्त याचा फटका काही डिव्हाईसला बसणार आहे?


Internet Blackout चा फटका कोणाला ?

TechCrunch ने दिलेल्या रिपोर्टनुसार Internet Blackout चा फटका काही मोजक्या डिव्हाईसेसला बसणार आहे. जे डिव्हाईस अप टू डेट नाही फक्त अशा डिव्हाईसला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे काळजी करण्याते कारण नाही. नव्या आणि अपडेटेड डिव्हाईसेसला याचा फटका बसणार नाही.

स्मार्टफोन किंवा मोबाईल इंटरनेट यूजर्सबद्दल बोलायचे झाले तर Android 7.11 किंवा त्या अगोदरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या डिव्हाईसमधील इंटरनेट चालणार आहे. तर  iOS 10 च्या अगोदरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे iPhones, iPads मधील इंटरनेट चालणार नाही. कम्युपटरबद्दल बोलायचे तर OS चा वापर करणाऱ्या डिव्हाईसला याचा फटका बसणार नाही. त्याशिवाय गेमिंग कंसोल जसे की  PS3 आणि PS4 बरोबर  Blackberry सारख्या डिव्हाइसेसवर इंटरनेट चालणार नाही.

Internet Blackout पासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्युटरमध्ये  अपडेट करा. Windows यूजर्सनी आपल्या कम्प्युटरच्या  कंट्रोल पॅनलमध्ये  जाऊन लेटेस्ट Windows Update करावे. तर iMac, iPad आणि Apple वापरणाऱ्यांनी ऑपरेटिंग सिस्टमच्या सेटिंगमध्ये जाऊन आपले लेटेस्ट अपडेट चेक करावे. तर Android यूजर्सनी आपल्या डिव्हाईसच्या सेटींगमध्ये जाऊन अबाऊट फोनवर क्लिक करावे आणि फोनमध्ये  OS च्या लेटेस्ट वर्जनला चेक करून अपडेट करावे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.