पंतप्रधानांच्या वाढदिवशी इंजोरीत वृक्षारोपण तर चान्ना येथे फळे व मास्कचे केले वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ सप्टेंबर २०२१

पंतप्रधानांच्या वाढदिवशी इंजोरीत वृक्षारोपण तर चान्ना येथे फळे व मास्कचे केले वाटप

 पंतप्रधानांच्या वाढदिवशी इंजोरीत वृक्षारोपण तर चान्ना येथे फळे व मास्कचे केले वाटप
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता.19 सप्टेंबर:-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी दिनांक 17 सप्टेंबर रोज शुक्रवार ला भारतीय जनता पार्टी, अनुसुचित जाती आघाडी भाजपा व जिल्हा परिषद बोंडगावदेवी क्षेत्राच्या वतीने प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे रुग्णांना  फळ व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे अध्यक्ष दिपंकर उके, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता कुलकर्णी, डॉ. कुंदन कुलसुंगे, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विवेक खंडाईत,  श्रीकांत वैद्य, काशिनाथ कापसे, छगन पातोडे, पुरुषोत्तम डोये, महेश लोगडे, लोकेश तरोणे प्रामुख्याने उपस्थित होते.आरोग्यवर्धिनी केंद्रातील 52 रुग्णांना फळे, मास्क वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरी येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, अनुसूचित जाती आघाडी भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपंकर उके, कल्पना भेंडारकर ,वंदना शिवणकर, दीपिका रहीले, रामकला हुकरे, मुख्याध्यापक विठोबा रोकडे, शिक्षक लाखेस्वर लंजे उपस्थित होते.

वृक्षांचे संवर्धन व जतन ही काळाची गरज आहे. नव्या पिढीने हे मौलिक कार्य पुढे न्यावे. अशी अपेक्षा लायकराम भेंडारकर यांनी यावेळी व्यक्त केली. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत वैद्य, छगन पातोडे ,पुरुषोत्तम डोये, प्रेमलाल नारनवरे, मोरेश्वर मेश्राम दिलीप हूकरे गुलाब ढोक कमलेश दिंडी लोकेश तरोणे, गौरीशंकर ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले.