एरंडेल तेलाचा पोट साफ करण्यासाठी कसा उपयोग करावा? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ सप्टेंबर २०२१

एरंडेल तेलाचा पोट साफ करण्यासाठी कसा उपयोग करावा?

 एरंडेल तेलाचा पोट साफ करण्यासाठी कसा उपयोग करावा?

पोटाला रोज एरंड तेलाने मसाज करावा. आहारातही रोज १-१ चमचा एरंड तेल घ्यावे. याने आतडय़ांना बळ मिळते व कोष्ठबद्धता दूर होते. नुसती पोट साफ होण्याची औषधे घेऊ नयेत

 How to use castor oil to cleanse the stomach?

  • तुम्ही याचा उपयोग महिन्यातून एकदा करू शकता
  • ज्या दिवशी करणार त्या अगोदर 2–3 दिवस जेवनागोदर गायीचं तूप घेऊ शकता
  • ज्या दिवशी तुम्हाला काहीच काम नसतील आणि घरीच राहणार असाल त्या दिवशी पहाटे तुम्ही हे करू शकता
  • पहाटे ज्या वेळेस तुम्ही शौचास जात त्याच्या अगोदर १-२ तास अगोदर तुम्ही २ चमचे एरंडेल तेल पिऊ शकता.आधी एक चमचा प्या लगेच चहा प्या परत एक चमचा तेल लगेच चहा प्या. काही वेळाने तुमचे पॉट अगदीच साफ होईल.
  • पूर्ण पोट साफ करण्यासाठी त्यानंतर कोमट पाणी पीत रहा. 10 मिनिटाच्या अंतराने जो पर्यंत सौचात कोमट पाणीच निघत नाही तो पर्यंत.
  • ते पिताना सांभाळून त्याचा वास आणि चव तुम्हाला नाय आवडणार ते पिताना उलटी झाल्यासारखी वाटेल पण तुम्ही ते पिऊन मोकळे व्हा.
  • त्यानंतर दिवसभर हलका आहार घ्यावा. पिवळी खिचडी घेऊ शकता
  • जरी तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर ला अवश्य भेटा

निरोगी राहण्यासाठी हजारो वर्षांपासून लोक अनेक घरगुती उपाय वापरीत आहेत. आयुर्वेदातील एरंडेल तेल केस आणि त्वचा रोगा सोबतच शरीराच्या अनेक रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते. एरंडेल तेल हे एका वनस्पती वृक्षा पासून मिळवले जाते. आजच्या लेखात आपण एरंडेल तेल काय आहे (castor oil in marathi), erandel tel use in marathi आणि एरंडेल तेलाचे फायदे आणि उपयोग पाहणार आहोत. तर चला सुरु करूया…

erandel tel | castor oil in marathi | एरंडेल तेल उपयोग
castor oil in marathi

एरंडेल तेल काय आहे ? castor oil in marathi

एरंड वनस्पती पासून बनवण्यात आलेले एरंडेल तेल औषधी रूपात खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जवळपास प्रत्येक रोगात एरंडेल तेल चा उपयोग केला जातो. खास करून याचा उपयोग डोळ्यांची समस्या, मूळव्याध, खोकला, पोट दुखणे इत्यादी समस्यांमध्ये केला जातो. एरंडेल तेल कप, वात आणि पित्त नियंत्रणात आणण्याचे कार्य देखील करते. याशिवाय अनेक औषधी बनवण्यासाठी देखील एरंडेल तेल चा उपयोग केला जातो.

एरंडेल तेलाचे फायदे

एरंडेल तेलाचे फायदे खूप चमत्कारिक आहेत. विविध रोगांमध्ये एरंडेल तेल चा उपयोग आणि त्याचे फायदे पुढे देण्यात आले आहेत.

सूजन कमी करण्यासाठी
जर शरीराच्या कोणत्याही अवयवावर सुजन आली असेल. तर एरंडेल तेलाच्या मालिश ने सुजन दूर करता येते. जर हाता पायाला कुठे ही सुजन आलेली असेल तर एका वाटीत थोडे एरंडेल तेल घेऊन त्याला हलके गरम करावे. हे गरम तेल हलक्या हाताने प्रभावित जागेवर लावावे आणि मालिश करावी. एरंडेल च्या या तेलात रिकिनोलिक एसिड असते. जे सुजन दूर करण्यात सहाय्यक ठरते.

दुखणे दूर करते
एरंडेल तेल (castor oil in marathi) सुजन कमी करण्यासोबतच शरीराच्या स्नायूंमध्ये होत असलेले दुखणे देखील कमी करण्यात सहाय्यक आहे. जर गुडघे, मान, कोपर इत्यादी स्नायूंमध्ये सारखे दुखत असेल तर एरंडेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून त्याला गरम करावे. व यानंतर हे तेल दुखत असलेल्या जागेवर लावावे. दररोज एरंडेल तेल लावल्याने दुखणे नक्कीच कमी होते.

बद्धकोष्टता आणि संडास साफ न होणे
पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल : बऱ्याच लोकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. जर आपणही बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रस्त असाल तर एरंडेल तेल हे तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक व कोणताही साइड इफेक्ट नसलेली चमत्कारी औषध आहे. ज्या लोकांना संडास साफ होत नसेल त्यांनी दररोज रात्री झोपण्याआधी एक चमचा एरंडेल तेल प्यावे. तुम्ही याचे सेवन दुधासोबत ही करू शकतात. एरंडेल तेल मध्ये लेक्सटिव असते. याच्या सेवनाने तुमचे पोट नक्कीच साफ होईल.