दुष्काळग्रस्त भागात बागायती शेती फुलवली | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ सप्टेंबर २०२१

दुष्काळग्रस्त भागात बागायती शेती फुलवली |

 भरघोस नफा देणारे पीक म्हणजे करवंद - ग्रामायण कृषी गाथेत आशीष जाधव

नागपूर,  ग्रामायण प्रतिष्ठान ग्रामीण व शहरी भागाच्या समन्वयासाठी कार्यरत आहे. शुक्रवार दि.३ सप्टेंबर ला कृषिगाथा भाग -५ आभासी पद्धतीने संपन्न झाला.

 आशिष जाधव यांनी कृषीगाथेत मार्गदर्शन केले. श्री आशीष एक उच्चशिक्षित युवा कृषी, व्यावसायिक, प्रगतिशील सृजनशील व्यक्तिमत्व आहे. (Ashish is a highly educated young agricultural, professional, progressive creative personality.)

त्यांना शेतीचे बाळकडू मिळाले, आणि काळ्या आईची ओढ वाढली, गणितासारख्या कठीण विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन देखील शेतीची आवड कमी झाली नाही!

शिक्षण आणि संसाधनाची जोड जमली, घरातील सगळी शेती व्यवस्थित नियोजन आराखडा तयार करून आत्महत्याग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या कोरडवाहू, खडकाळ जमीन असलेल्या दुष्काळग्रस्त भागात बागायती शेती फुलवली. त्यांच्या शेतीमध्ये आंबा, ऊस, फणस, लिंबू यांची त्यांनी लागवड केली आहेच, परंतु मोठ्या प्रमाणात लागवड आणि नफ्याचे पीक आहे ते म्हणजे करवंद असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

करवंद पिकाविषयी उद्बोधन करतांना, मा. आशिष यांनी सांगितले की करवंद हे वार्षिक रानटी पीक आहे जे अंत्यत कमी खर्च, जोपासणूक आणि बहुउपयोगी असे आहे. या पिकावर पाणी, जमीन, वातावरण किंवा नैसर्गिक आपत्ती यांचा दुष्परिणाम होत नाही अथवा अंशतः होतो.  (Horticulture flourished in the drought stricken areas)

लागवडी बद्दल माहिती मध्ये एकरी ६०० ते ७०० झाड आपण लावू शकतो. तसेच पर्यायी पीक व सरंक्षण म्हणून कुंपणासारखी याची लागवड करता येते. वयवर्षानुसार पिकाच्या प्रमाणात देखील वाढ होते कुठलीही अतिरिक्त काळजी न घेता. ज्यात भरघोस नफा देखील आहे.

शेतीतून व्यवसाय आणि करवंदाच्या उत्पादन हा त्यांचा प्रवास सुरु आहे. ज्यात ते हिरवा व गुलाबी यातील गुलाबी करवंदाचा पर्याय निवडतात कारण चेरी, वाइन, मुरब्बा इ. साठी त्याची मागणी आहे. नफा वाढ व व्यवसायात पदार्पण करण्यासाठी ते आता करवंदाची प्रकिया स्वतः करणार आहे असे त्यांनी नमूद केले.

युवा शेतकऱ्यांना तसेच हताश शेतकऱ्यांना त्यांनी खचून न जाता स्वतःच्या संसाधनाचा वापर करून कसे यशस्वी व्हावे याचा सुकर मार्ग दाखविला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किशोर केळापुरे यांनी केले. तर श्री सुमीत माईणकर यांनी श्री जाधव यांची मुलाखत घेतली. ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर द्वारे विविध कार्यक्रम, गाथा तसेच कार्यशाळा घेतल्या जातात त्याचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.


Horticulture flourished in the drought stricken areas