गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला जेवणावरून स्वयंपाक्यावर चाकू हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२१

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला जेवणावरून स्वयंपाक्यावर चाकू हल्ला


  गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला जेवणावरून स्वयंपाक्यावर चाकू हल्ला

गणपतीचे जेवण बनविण्याच्या वादातून एका इसमावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घुग्गुस येथील अमराई वार्डात घडली आहे.या प्रकरणी घुग्गुस पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.महेंद्र सेनापती असे आरोपीचे नाव आहे तर भीम दीप असे जखमीचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अमराई वार्डात गणपतीचे जेवण होते. हे जेवण भीम दीप यांनी बनविले होते. अशातच आरोपी महेंद्र सेनापती याने जेवण बरोबर बनविले नाही म्हणून भीम दीप यांच्यासोबत भांडण केले. तसेच जवळ असलेल्या चाकूने त्यांच्या पोटावर वार केले. त्यानंतर दीप यांना घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. 

या संपूर्ण घटनेची तक्रार भीम दीप यांच्या पत्नीने घुग्गुस पोलिसात दिली. घुग्गुस पोलिसांनी आरोपी महेंद्र सेनापती विरोधात 324,504 कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे.