Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार याना राज्यस्तरीय कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ प्रदान

 प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार याना राज्यस्तरीय कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ प्रदानसंजीव बडोले प्रतिनिधी


नवेगावबांध दि.25 सप्टेंबर:

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) नागपूर विभाग नागपूर तर्फे आयोजित राज्यस्तरीय कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ मध्ये प्राथमिक गटात नवेगावबांध येथील रहिवासी पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी ता-लाखांदूर जिल्हा-भंडारा येथील प्रयोगशील शिक्षक खुशाल किसन डोंगरवार यांनी सादर केलेल्या उपक्रमांतून पर्यावरण विकास या नवोपक्रमास प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. दिनांक २३ सप्टेंबर २०२१ ला रविभवन नागपुर येथे राज्यस्तरीय कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार सोहळ्यात  बबनरावजी तायवाडे सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग, अँड.अभिजीतजी वंजारी आमदार पदवीधर मतदार संघ नागपुर, यांच्या हस्ते  मिलिंदजी वानखेडे , खुशालरावजी पाहुणे, दिनानाथजी वाघमारे ,खिमेशजी बढिये यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार खुशाल किसन डोंगरवार यांना प्रदान करण्यात आला.यावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून  आलेले पुरस्कारार्थी, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

 खुशाल डोंगरवार यांच्या निवडीबद्दल रमेश शिक्षण संस्था कुडेगाव ता-लाखांदूरचे सचिव  नरेश जयदेवजी मेश्राम, तसेच समस्त पदाधिकारी रमेश शिक्षण संस्था कुडेगाव, शाळेचे मुख्याध्यापक किशोर शहारे, सहयोगी शिक्षक  भालचंद्र चुटे, कु अनुराधा रंगारी आणि समस्त शिक्षक मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 खुशाल डोंगरवार यांनी आपल्या यशाचे श्रेय हेमराजजी कापगते उपाध्यक्ष शा.व्य.स., तथा समस्त पदधिकारी शा.व्य.स.,

समस्त पदधिकारी माता पालक संघ, समस्त पदधिकारी पालक शिक्षक संघ, समस्त पदाधिकारी ग्रामपंचायत पिंपळगाव कोहळी, विनोद शहारे,चंपाबाई बागडे, शेवंताबाई शहारे, समस्त पालकवर्ग,आणि पिंपळगाव कोहळी येथील समस्त गावकरी आणि आपल्या कुटुंबिय यांना दिले आहे.


मला मिळालेल्या या यशात माझे सहकारी शिक्षक,माझे विद्यार्थी, पालकवर्ग,पिंपळगाव कोहळीचे समस्त गावकरी यांची प्रेरणा आणि सहकार्य याचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे हे पुरस्कार हे माझे एकट्याचे नसून आम्हा सर्वांचे आहेत. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मला वेळोवेळी प्रेरणा देत असतात त्यामुळेच मला इथपर्यंत पोहचता आलं.मी अशाचप्रकारे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समोरही जोमाने कार्य करेन.अशी प्रतिक्रिया खुशाल डोंगरवार पुरस्कार प्राप्त सहा.शिक्षक यांनी व्यक्त केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.