वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांना सुवर्णपदक | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ सप्टेंबर २०२१

वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांना सुवर्णपदक |

एलाइट मेन्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीप


वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या  विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांना सुवर्णपदकमुंबई : बुलडाणा येथे दि. ३ ते ७ सप्टेंबर २०२१ या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरावरील पुरुषांसाठीच्या ९० व्या एलाइट मेन्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये (Elite Men's Maharashtra State Boxing Championship) वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथील वीर सावरकर बॉक्सिंग क्लबमधील मुष्टियोद्धे हे मुंबई जिल्हा मुष्टियोद्ध्यांच्या चमूचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या स्पर्धेसाठी गेलेल्या चमूमधील या दोघांनी सुवर्णपदक मिळवले असून आता एलाइट मेन्स नॅशनल बॉक्सिंग चँपियनशीपसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे ते जातील.  बेल्लारी येथे येत्या १५ ते २२ सप्टेंबर २०२१ या दरम्यान ही मुष्टियुद्ध स्पर्धा होणार आहे. 


Elite Men's Maharashtra State Boxing Championship