डॉ. श्वेता कुलकर्णी यांचा उपक्रम, रुग्ण तपासणी व औषधे मोफत केले वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ सप्टेंबर २०२१

डॉ. श्वेता कुलकर्णी यांचा उपक्रम, रुग्ण तपासणी व औषधे मोफत केले वाटप

डॉ. श्वेता कुलकर्णी यांचा उपक्रम, रुग्ण तपासणी व औषधे मोफत केले वाटप

रुग्णसेवा करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साजरा केला आपला वाढदिवस
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.8 सप्टेंबर:-


अनेक जण आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी च्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांनी रुग्णांची तपासणी व मोफत औषध वाटप करून आपला वाढदिवस दिनांक सहा सप्टेंबरला साजरा केला. सदर उपक्रमाचे परिसरात अभिनंदन केले जात आहे. आजचा आपला वाढदिवस श्वेता कुलकर्णी यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे परिसरातील रुग्णांची आरोग्य तपासणी करून व मोफत औषधे वाटप करून साजरा केला.

यावेळी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, औषधी निर्माता शिरपात्रे, बाह्यरुग्ण विभाग आरोग्य सेविका उईके, आरोग्य सहाय्यक शेंडे, परिचर शेंडे, तांडले, सुमित्राबाई, बाळू, वाहक उरकुडे यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त या आरोग्य तपासणी शिबिराला सहकार्य केले.