भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सौंदड स्टेशनवर उद्या रेल्वे गाडीचे होणार स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ सप्टेंबर २०२१

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सौंदड स्टेशनवर उद्या रेल्वे गाडीचे होणार स्वागत

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सौंदड स्टेशनवर उद्या रेल्वे गाडीचे होणार स्वागत


संजीव बडोले प्रतिनिधी

नवेगावबांध दि. 28 सप्टेंबर:-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबरला सौंदड रेल्वे स्टेशन वर गोंदियावरून सकाळी 7-40 ला सुटनाऱ्या व सौंदड स्टेशन वर 8:30 ला पोहोचणा-या पहिल्या रेल्वे गाडीचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सडक अर्जुनी तालुका सचिव अशोक मेश्राम साकोली तालुक्याचे सचिव काँ. दिलीप उंदिरवाडे,गोरेगाव तालुका सचिव चरनदास भावे, गोंदिया तालुका सचिव काँ .प्रल्हाद ऊके इत्यादींनी केले आहे.देशात सर्वत्र लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून कोरोणा काळात सुरू करण्यात आल्या .या गाड्यांमध्ये आरक्षित प्रवाशांशिवाय प्रतिक्षा यादी मधले व आर सी चे प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोना होत नाही ,पण गोंदिया चंद्रपूर बल्लारशाह, गोंदिया बालाघाट कटंगी या रेल्वे मार्गावर .जी कामगार ,शेतकरी शेतमजूर,कमी वेतनावर काम करणारे रोजंदारी चे कामगार, यांचे प्रवासी प्रवास करतील ,अशा या डेमो ,मेमो लोकल गाड्या मात्र सुरू करण्यात आल्या नाही कष्टकरी जनतेच्या या गाड्या सुरू न केल्यामुळे या जनतेला महागड्या एसटीने किंवा अति महागड्या खाजगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करावा लागतो.या बाबींचा विचार करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथील कार्यकर्त्यांनी,पुढाऱ्यांनी चर्चा करून 15 सप्टेंबरला सौंदड/ रेल्वे येथे रेल्वे चौकी व राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर केले. हे आंदोलन होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने व हितसंबंधीयांनी सर्व प्रकारच्या दडपशाहीच्या शस्त्रांचा उपयोग केला पण त्याला क्म्युनिस्ट पक्ष बधले नाही. 15 सप्टेंबरला सौंदड /रेल्वे स्टेशनच्या पटांगणावर मोठे जाहीर निषेध धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर राज्य कार्यकारणी सदस्य हौसलाल रहांगडाले ,डॉक्टर महेश कोपुलवार ,माजी राज्य कौंसिल सदस्य काँ.रामचंद्र पाटील ,राज्य कौन्सिल सदस्य सदानंद ईलमे,काँ. करुणा गणविर,काँ विनोद झोडगे, गोंदिया जिल्हा सचिव कांम्रेड मिलिंद गणवीर ,भंडारा जिल्हा सचिव काँ.हिवराज ऊके, गडचिरोली जिल्हा सचिव काँ. देवराव चवळे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले याबद्दल काँ शिवकुमार गणवीर काँ मिलिंद गणवीर ,सडक अर्जुनी तालुका सचिव काँ अशोक मेश्राम व सहसचिव काँ.ललित वैद्य यांचेवर भारतीय भा.द.वि.चे कलम 269, 270 ,188 उपकलम 52 (ब)व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .या सभेत काँ. शिवकुमार गणवीर व सर्व वक्त्या्नी जाहीर केले होते की, 15 दिवसात ह्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या नाही, तर "कटंगी गोंदिया ते बल्लारशा "या सर्व रेल्वे स्टेशन वर पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. शेवटी रेल्वे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन 20 सप्टेंबर पासून गोंदिया चंद्रपूर बल्लारशा व 29 सप्टेंबर पासून गोंदिया बालाघाट कटंगी तुमसर तिरोडी ,नागपूर रायपूर यासारख्या लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा ,गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर येथील कार्यकर्त्यांनी व वरील सर्व नेत्यांनी रेल्वे प्रशासनाला धन्यवाद दिले आहे .आपल्या पक्षाच्या आंदोलनामुळे ह्या गाड्या सुरू झाल्या म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वरील 4 ही जिल्ह्यातर्फे दिनांक 28 सप्टेंबरला सौंदड रेल्वे स्टेशन वर गोंदियावरून सकाळी 7-40 ला सुटनाऱ्या व सौंदड स्चेशन वर 8:30 ला पोहोचणा-या पहिल्या रेल्वे गाडीचे जंगी स्वागत करण्यात येण्याची घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सडक अर्जुनी तालुका सचिव अशोक मेश्राम साकोली तालुक्याचे सचिव काँ. दिलीप उंदिरवाडे,गोरेगाव तालुका सचिव चरनदास भावे, गोंदिया तालुका सचिव काँ .प्रल्हाद ऊके इत्यादींनी केले आहे व जनतेलाही या स्वागत कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.