महिला अत्याचाराशी संबंधित अदखलपात्र गुन्ह्यातील व्यक्तीला किमान दहा दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ सप्टेंबर २०२१

महिला अत्याचाराशी संबंधित अदखलपात्र गुन्ह्यातील व्यक्तीला किमान दहा दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करा

महिला अत्याचाराशी संबंधित अदखलपात्र गुन्ह्यातील व्यक्तीला किमान दहा दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करा- महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी केली मागणी

एकतर्फी प्रेमातून प्रफुल्ल आत्राम या इसमाने बाबूपेठमधील एका तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात त्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे व विशेष सरकारी वकील नेमण्याचे आदेश दिले आहे. मृतक अल्पवयीन युवतीच्या वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये 1 सप्टेंबर रोजी आरोपी विरुद्ध तक्रार दिली होती. एफआयआरची कॉपी देखील त्यांच्याकडे आहे. त्यानुसार सदर आरोपीवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला, यानंतर एका आठवड्यातच संबंधित आरोपीने पीडित युवतीवर धारदार चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली व उपचारादरम्यान तिचा मृत्य झाला. यात गंभीरपणे बघितल्यास लक्षात येते की, आरोपीवर लक्ष ठेवले असते, तर हि दुर्दैवी घटना टाळता आली असती म्हणूनच महिला अत्याचाराशी संबंधित अदखलपात्र गुन्ह्यांकडे देखील गंभीरपणे बघितले जाऊन ज्याची तक्रार आहे त्या व्यक्तीला तक्रार दाखल झाल्यापासून किमान दहा दिवस रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करावे. तसेच तक्रारकर्त्या महिलेला (युवतीला) पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी जेणेकरुन अशा घटना भविष्यात टाळता येतील असे निवेदन महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी अतिरीक्त पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांना दिले. यावेळी महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, काँग्रेस सेवा फाउंडेशन च्या शहर अध्यक्षा शीतल काटकर, सेवादल महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे यांची उपस्थिती होती.


 #chandrapur #crime #women