इंजोरी येथे ४० वर्षाची परंपरा असलेला ताना पोळा साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१४ सप्टेंबर २०२१

इंजोरी येथे ४० वर्षाची परंपरा असलेला ताना पोळा साजरा

 इंजोरी येथे ४० वर्षाची परंपरा असलेला ताना पोळा साजरा
संजीव बडोले

जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.


नवेगावबांध ता.14

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मौजा इंजोरी येथे मौजा इंजोरी येथे ताना पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या गावात गेल्या 40 वर्षांपासून समस्त गावकरी ताना पोळा साजरा करीत असतात. चत्रूभाऊ भेंडारकर महाराज श्रावण महिन्यात येथील श्री हनुमान मंदिरात रोज सायंकाळी अविरतपणे हरिपाठाचा कार्यक्रम घेत असत. त्याची समाप्ती पोळ्याच्या दिवशी होत असे. ताना पोळ्याला समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात ताना पोळा साजरा करीत असत. त्यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लायकराम भेंडारकर यांनी  हीच परंपरा  पुढे सुरू ठेऊन,त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. यावर्षी देखील हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करून पोळयाला त्याची समाप्ती करण्यात आली. तसेच ताना पोळा सर्व ग्रामवाशीयांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. त्यानिमित्ताने भजनी मंडळ यांचे भजनाचा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आयोजक लायकराम भेंडारकर, बोरटोला गट ग्रामपंचायतचे उपसरपंच काशिनाथ कापसे, ग्रामपंचायत सदस्य दीपंकर उके, प्रेमलाल नारनवरे, वनिता मेश्राम पोलीस पाटील, डाकराम मेंढे राधेश्याम हूकरे ,बळीराम मेंढे, कृष्णा मेंढे,भुवनाथ मेश्राम, दिलीप हूकरे, एकनाथ मेश्राम, मंगलमूर्ती शिवणकर महाराज, भीमराव शिवणकर, योगेश शिवणकर लंकेश मेंढे, रोशन मेंढे, अरुण मेंढे, आशा सेविका लताबाई मेंढे, पृथ्वीराज भेंडारकर व समस्त इंजोरी ग्रामवाशी यावेळी उपस्थित होते.


गावात ही परंपरा सुरु रहावी. एक भावनिक वातावरण निर्माण व्हावे. आपली संस्कृती पुढील पिढ्यात जोपासली जावी. ताना पोळा निमित्त आयोजित स्पर्धेतून मुलांमध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण व्हावे. हे या आयोजनामागील उद्देश आहे.

- लायकराम भेंडारकर, इंजोरी.