Breaking नदीत पाच युवक बुडाले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ सप्टेंबर २०२१

Breaking नदीत पाच युवक बुडाले


कन्हान नदीत पाच युवक बुडाले

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाच युवक बुडाले. नदीजवळ असलेल्या अम्मा दर्गा येथे यवतमाळच्या दिग्रसमधील 12 युवक दर्शनाला आले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे युवक कन्हान नदीत आंघोळ करायला उतरले. मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने एका युवकाची बुडण्यास सुरुवात झाली. यानंतर एक-एक करुन पाच युवक एका पाठोपाठ नदीत बुडाले. बुडालेल्या युवकांमध्ये सय्यद लकी (वय 22), अयाज बेग (वय 20), अबुंके बेग (वय 18) सिब्दान शेख (वय 21) खवडजा बेग (वय 17) आहे. वाहून गेलेल्या तरुणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कन्हान पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.


Five youths drowned in the river