बोरटोला ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम कर भरणाऱ्या ७५ ग्रामवाशीयांचा ग्रामपंचायत ने केला सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ सप्टेंबर २०२१

बोरटोला ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम कर भरणाऱ्या ७५ ग्रामवाशीयांचा ग्रामपंचायत ने केला सत्कार

 बोरटोला ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

कर भरणाऱ्या ७५ ग्रामवाशीयांचा ग्रामपंचायत ने केला सत्कार
संजीव बडोले प्रतिनिधी


नवेगावबांध ता.११ सप्टेंबर:-

कोविड १९ कोरोनाव्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या रोजगारावर गदा आली. कामधंदे बंद असल्यामुळे अनेक मजुरांना हातावर हात मारून घरी बसावे लागले. त्यामुळे ग्रामपंचायतीचे विविध कर कसे भरायचे? असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला होता. त्यामुळे ग्रामपंचायतींनी पथदिव्यांची बिल न भरल्यामुळे अनेक गावे अंधारात गेली. हाताला काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न जटील झाला. ग्रामीण भागातील गावगाडा कोरोनामुळे प्रभावित झाला.कोरोना मुळे राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच इतर वित्तीय संस्था यांना जबर आर्थिक फटका बसला, मग त्याला ग्रामपंचायती कसे अपवाद राहतील. राज्यातील ग्रामपंचायतीचा कर नागरिकांनी न भरल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. गावातील अनेक विकास कामे निधीअभावी रखडली आहेत. असे असताना कर वसुली ला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला ग्रामपंचायतीने मात्र ग्रामपंचायतीचे कर भरणाऱ्या नागरिकांचा ताना पोळ्याच्या दिवशी जबाबदार नागरिक म्हणून, नियमित कर भरणाऱ्या तब्बल ७५ नागरीकांचा सत्कार करून गावाचा विकास करण्यासाठी नागरिकांनी कर भरण्यासाठी पुढे यावे. म्हणून जिल्ह्यात प्रथमच असा हा अभिनव उपक्रम राबविला गेला. या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात असून ,जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती कर वसुलीसाठी आता अशी नवनवे फंडे राबवून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करतील असे प्रेरणादायी कार्य बोरटोला ग्रामपंचायतने एक आदर्श जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसमोर ठेवला आहे.

सन२०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातील घर टॅक्स निल करणाऱ्या बोरटोलागावातील नियमित कर्ज भरणाऱ्या तब्बल एक नव्हे तर ७५ ग्रामवासीयांचा  ताना पोळ्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत च्या वतीने एक जबाबदार नागरिक म्हणून,शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. ग्रामवाशीयांना  कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याबरोबरच आतापर्यंत गावचे पदाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या व आज ह्यात असलेल्या माजी सरपंच देवराम कापसे, रवींद्र खोटेले, गिताबाई नारनवरे, शेवंताबाई गुढेवार, माजी रोजगार सेवक धर्मनाथ मानकर, माजी पोलीस पाटील शंकर कापसे यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वासुदेव सयाम हे होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लायकराम भेंडारकर ,पोलीस पाटील शंकर तरोणे, सरपंच कुरुंदा वैद्य, उपसरपंच काशिनाथ कापसे, भारती डोये, वनिता मेश्राम, दीपंकर उके, राजकुमार मेंढे प्रेमलाल नारनवरे, नितीन खंडाईत, सुशील येरणे व बोरटोला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सचिन रोकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसरपंच काशिनाथ कापसे यांनी मानले. या अभिनव कार्यक्रमाला बोरटोला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.