भद्रावती विकास खंड औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्थेची ( बीएलवी ) आमसभा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ सप्टेंबर २०२१

भद्रावती विकास खंड औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्थेची ( बीएलवी ) आमसभा


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

:- येथील भद्रावती विकास खंड औद्योगिक बहूउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्थेची (बीएलवी ) आमसभा संस्थेच्या कार्यालयात नुकतीच घेण्यात आली.                     
            आमसभा कवडूजी पावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आमसभेची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष तथा
माजी नगरसेवक राजू गैनवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली. याप्रसंगी किशोर बावणे, सुशीला आवारी ,वंदना मेश्राम,सरला पडवेकर हे मंचावर उपस्थित होते.
 
  यावेळी उपस्थित मान्यवरांनी यासंस्थेचे उद्दिष्ठ  व कार्यप्रणाली याविषयी माहिती दिली.  अहवाल वाचन प्रवीण आत्राम संस्थेचे सचिव  यांनी केले.बेरोजगारांना कर्ज व रोजगार देणेे त्यांना उद्योग धंद्यांना प्रोत्साहित करने असा या संस्थेचा उद्देश आहे. या
सभेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करून ठरावास मंजुरी देण्यात आली.
 या  आमसभेत प्रकाश पिंपळकर, ज्ञानेश्वर डुकरे, गजानन जोगी, वसंता उमरे यांचेसह  असंख्य सभासद उपस्थित होते.