कोविड नियमाचे पालन करुन प्राथमिक शाळा सुरु कराव्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ सप्टेंबर २०२१

कोविड नियमाचे पालन करुन प्राथमिक शाळा सुरु कराव्या


शिरीष उगे, वरोरा/प्रतिनिधी :- कोविड नियमाचे पालन करुन प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा वरोरा च्या वतीने मा.प्रशांत बेडसे पाटील तहसिलदार वरोरा,मा.तुकाराम कुचनकर गटशिक्षणाधिकारी,मा.पाटील मैडम अधिक्षक यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री व मा.अजितजी पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे केली.निवेदनात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.कोविड नियमाचे पालन करुन प्राथमिक शाळा सुरु कराव्या.

सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीत 1 जानेवारी 2004 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतन निश्चितीत होणारा अन्याय दुर करावा.जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संदर्भातील बी.डी.एस प्रणाली तात्काळ सुरु करावी.इयत्ता सहावी ते आठवी ला शिकविनारया सर्वच पदविधर शिक्षकाची वेतनश्रेणी 100 टक्के पदाना लागू करावी.  
अश्या मागण्या करण्यात आल्या.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक राजेंद्र पांडे जिल्हा संपर्क प्रमुख,प्रभाकर महाकारकर तालुका अध्यक्ष,विकास घागी कार्यवाह,सतिष डांगरे कार्याध्यक्ष,रंगनाथ मत्ते कोषाध्यक्ष,दिलीप टिपले उपस्थित होते.