पोळ्याच्या दिवशी आले शेतक-यावर संकट ; एका बैलाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ सप्टेंबर २०२१

पोळ्याच्या दिवशी आले शेतक-यावर संकट ; एका बैलाचा मृत्यूशिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
        पोळ्याचा उत्साह ग्रामीण भागातील शेतकरी थाटात करतो बैलाला पोळ्याच्या दिवशी अंघोळ घालून स्वच्छ करतात आणि बैल सजवितात आणि यातच वरोरा तालुक्यातील शेगाव (बु)  येथिल अत्यंत गरिब शेतकरी रामेश्वर वासुदेव शेंडे या गरीब शेतकर्याचा बैल पोळ्यातुन घरी आणताना घराजवळील नालिमध्ये पडुन बैलाचा जागीचं मुत्यु झाला.
         आधिच कर्ज बाजारी असलेला शेतकरी या संकटामुळे हवाल दिल झाला. या शेतक-याची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. त्यात बैलाचा मृत्यु झाल्यामुळे डोंगर कोसळले आहे.    
झालेली घटना लक्षात घेवुन शासनाने त्वरीत मदत करावी अशी मागणी गावक-यांकडुन केली जात आहे.