चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जामगाव येथील शेतक-याला मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ सप्टेंबर २०२१

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जामगाव येथील शेतक-याला मदतस्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जामगाव व परीसरातील ग्रामीण जनतेमधे कोरोना प्रादुर्भावाविषयी जाणिवजागृती.


 शिरीष उगे वरोरा/प्रतिनिधी 
         :-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर द्वारा शेतकरी कल्याण निधी अंतर्गत वरोरा तालुक्यातील जामगाव येथील शेतकरी संजय किसन काकडे यांना शेतातील गोठा व शेती अवजारे जळाल्याने आर्थीक मदत करण्यात आली.
सदर योजना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह चंदनसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या व यांच्या सूचनेनुसार बॅंकेच्या संचालक मंडळाद्वारा राबविण्यात येत आहे.
  
यावेळी बैकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरेकर, वसंताभाऊ मानकर, सरपंच जोत्सनाताई घागी, गणेश घागी, माजी पोलीस पाटील विक्रम कुरेकार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद डाहुले, गोपाल राजपुत, ग्रा.स. संगीताताई घोगे, जोसनाताई कुरेकार, आदी उपस्थित होते.

 स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रवि शिंदे यांनी यावेळी जामगाव व परीसरातील ग्रामीण जनतेमधे कोरोना प्रादुर्भावाविषयी जाणिवजागृती केली. जनतेला कोरोना काळात घ्यावयाची काळजी व कोविड लस घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांनी कोरोना योध्दा बणून कोरोनामुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.