दुचाकीची चारचाकी वाहणाला धडक ; वृद्धाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० सप्टेंबर २०२१

दुचाकीची चारचाकी वाहणाला धडक ; वृद्धाचा मृत्यू

.शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
          :- भद्रावती - नागपूर चंद्रपूर महामार्गावरील एनटीपीसी जवळ दूचाकी ने धडक दिल्याने मागे बसलेला वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारच्या रात्री दरम्यान घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
             अरविंद लक्ष्मण कळसकर वय 69 राहणार सावनेर नागपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अरविंद हा आपल्या भावासोबत भद्रावती येथे तहसील कार्यालयाच्या कामाकरिता दुचाकी क्रमांक 38 एस 0 107 नी आला असता काम आटोपून एनटीपीसी इथे राहणाऱ्या भावा कडे जात असताना वरोरा कडून येणाऱ्या चार चाकी वाहन एम एच 47 वाय O867 ने मागावून धडक दिली यातील वाहक चालक गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत अरविंद याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक बोढे करीत आहे.