तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्हायाचा समावेश करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ सप्टेंबर २०२१

तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्हायाचा समावेश करा  • ऑल इंडिया बंजारा टायगर्स संलग्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  महासचिव - अशोक जाधव यांची मागणी
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन

शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
      - : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामधील ११ जिल्ह्यांकरीता तांडा सुधार योजना कार्यक्रम आदेश निर्गमित केले आहेत. परतु त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. चंद्रपुर जिल्ह्यात जवळपास ७२ तांडे बंजारा समाजाचे असुन त्या तांड्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सदर तांडे विकासापासून अजूनही कोसो दुर आहेत. सदर तांडयाना महसुली दर्जा प्राप्त न झाल्याने त्या तांड्यातील विकास रखडलेला असुन तेथील नागरिकांना नाहक हाल अपेष्टा भोगाव्या लागत आहे. हलाखीच्या परिस्थितीत त्रास सहन करावा लागत आहे.
          सदर तांड्यात बंजारा समाजाची लोकसंख्या ईतर समाजा पेक्षा जास्त आहे. ब-याच तांड्यामध्ये फक्त बंजारा समाजचं वास्तव्यास आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्हायातील  तांड्याच्या विकासाकरिता मिळाला नाही. तर बंजारा समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनेपासून हे तांडे वंचित राहतील आणि पुन्हा ते दारीद्रयाच्या विळख्यात गुरफटत राहतील.
         त्यामुळे सदर योजना चंद्रपूर जिल्हासाठी सुध्दा अंमलात आणण्याकरिता तसेच शासनाचे आदेश निर्गमित करून जिल्ह्यस्तरीय समितीवर बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व नेमण्यात यावेत. अशी मागणी समाजाच्या वतीने अशोक दि. जाधव महाराष्ट्र प्रदेश महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स संलग्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी केली आहे.