केंद्र सरकारकडून शेतकरी बांधवांना अमानुष वागणुक : मुनाज शेख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ सप्टेंबर २०२१

केंद्र सरकारकडून शेतकरी बांधवांना अमानुष वागणुक : मुनाज शेखशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
          :- भक्कम कृषिसंस्कृतीच्या पायावर आपला कृषिप्रधान देश उभा आहे. कोरोनाच्या काळात इतर सर्व क्षेत्रांनी अक्षरशः लोटांगण घातलेलं असताना एकमेव कृषिक्षेत्राने दमदार कामगिरी करत आपल्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. केंद्रातील क्रूर सरकारने मात्र आमच्या शेतकरी बांधवाचं स्वातंत्र्य हिरावून त्यांना गुलामगिरीच्या अंधारात ढकललं. संसदेतील आपल्या राक्षसी बहुमताचा दुरुपयोग करून केंद्र सरकारने अमानुष कृषी कायदे संमत करून घेतले. या कायद्यांच्या व हुकूमशाही पध्दतीने काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले. बळाचा वापर करून अतिशय निर्दयीपणे हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले. कडाक्याच्या थंडीत शेतकरी बांधवांवर थंड पाण्याचा मारा केला, शेतकरी बांधवांच्या वाटेत खिळे ठोकले, लाठ्या काठ्यांचा वर्षाव केला परंतु शेतकऱ्यांनी माघार घेतली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या या लढ्यात आजपर्यंत ६०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मात्र केंद्र सरकारकडून शेतकरी बांधवांना अमानुष वागणूक मिळत आहे. मोदी सरकारच्या या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात शेतकरी कृती समितीने देशव्यापी बंद पुकारला , महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटकपक्षांनी या देशव्यापी बंदला पाठिंबा देवुन केंद्र सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केले. शेतकरी बांधवावर लादन्यात आलेले कृषि विधेयक वापस घेवुन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे असी विनंती राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी वरोरा-भद्रावती विधानसभा तर्फे देशाचे पंतप्रधान यांना भद्रावती तसिलदार यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांनी पत्रपाठवुन केले यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर,जिल्हा उपाध्यक्ष अँड.युवराज धानोरकर,महीला शहर अध्यक्ष सबिया देवगडे,विधान सभा अध्यक्ष महीला कु.किरण सालवी,तालुका महीला अध्यक्ष दुर्गा बिश्वास, युवक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रोहन कृटेमाटे ,शहर उपाध्यक्ष कृष्णा तुराणकर,शहर महासचिव अँड कुणाल पथाडे, अँड जिवने, संतोष वास्मवार, रवि नागपुरे, पनवेल शेंडे, इरफान भाई, अमोल बडगे, राकेश किनेकर, आशिष लिपटे, राजेश मंदनवार,वैभव जुलमे,तेजस पुरी,सुरज कोल्हे आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थीत होते.