भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेने केले रास्ता रोको आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ सप्टेंबर २०२१

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेने केले रास्ता रोको आंदोलन


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
              :-भारतीय कम्युनिस्ट पक्ष 😊व अखिल भारतीय किसान सभे तर्फे संपूर्ण भारत बंद आंदोलन करण्यात आले. भारत बंदच्या निमित्याने नागपूर – चंद्रपूर नॅशनल हायवे रोड टप्पा चौक येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कॉम्रेड संतोष दास जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा, कॉम्रेड डी. एच. उपसे कामगार नेते ओ. एफ. चांदा., कॉम्रेड ए. के. कॅप्टन वेकोली कामगार नेते, कॉम्रेड दिलीप बनकर वेकोली कामगार नेते यांनी केले. यात रास्ता रोको निदर्शने, नारे बाजी करण्यात आले व मोदी सरकार चा निषेध करण्यात आला व तहसीलदार याना निवेदन देण्यात आले. मोदी सरकारच्या जनविरोधी कार्पोरेट धार्जिण्या व देश विकाऊ धोरणा विरुद्ध संपूर्ण देश "भारत बंद" आंदोलन पुकारण्यात आले.
             गेल्या दहा महिन्या पासून शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द करा या मागणी साठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. परंतु केंद्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही.
मोदी सरकार ने रेल्वे, संरक्षण खाते, सार्वजनिक बँक, जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन, एल. आय. सी., इतर सार्वजनिक कंपन्या, तेल उद्योग यांचे खाजगीकरण करणार असे जाहीर केले. याचा निषेध करण्या करीता भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राष्ट्रीय व स्थानिक एक ते पंधरा मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती नवी दिल्ली, प्रधान मंत्री नवी दिल्ली, राज्यपाल मुंबई, मुख्यमंत्री मुंबई यांना पाठविण्यात आले.
                 या आंदोलनात कॉम्रेड राजू गैनवार, संतोष दास, ए. के. कॅप्टन, डी. एच. उपासे, दिलीप बनकर, प्रकाश रेड्डी, बेबी कुळमेथे, नितीन कावठी, सुरेश मने, संतोष सातभाई, शारदा पेटकर, पंचफुला पेटकर, वनिता पाटील, सुमन कुळमेथे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.