कुमारिका डॉक्टरचा विनयभंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२६ सप्टेंबर २०२१

कुमारिका डॉक्टरचा विनयभंग

(भद्रावती प्रतिनिधी)  :- शहरातील 26 वर्ष कुमारिका डॉक्टर चा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी घडली. कुमारिकेने रविवार ला केलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 प्रमोद कांबळी वय 35 वर्षे राहणार भद्रावती असे आरोपीचे नाव आहे  26 वर्षीय कुमारिका डॉक्टर ही नंदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. ड्युटी झाल्यानंतर ती भद्रावती कडे परत येत असताना तिची दुचाकी वाहनात बिघाड आल्याने ती वाटेत थांबली होती . मागाहून येणाऱ्या प्रमोद त्याने तिचे जवळ येऊन अश्लील हातवारे केले व जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहे.