टाकळी बेलोरा येथील जमीन अरबिंडो कंपनीला देण्यास गावकऱ्यांचा विरोध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ सप्टेंबर २०२१

टाकळी बेलोरा येथील जमीन अरबिंडो कंपनीला देण्यास गावकऱ्यांचा विरोध


                  तहसीलदारांना दिले                 निवेदन.
       अरबिंडो कंपनी सर्वेक्षण प्रकरण
 
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
            :- तालुक्यातील मोजा टाकळी बेलोरा येथे अरबिंडो कंपनीचे गावकऱ्यांची फसगत करून  सर्वेक्षणाच्या मार्फत स्वाक्षरी केल्याचा प्रकार केल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अरबिंडो कंपनीला जमिनी देण्यास नकार केला असून याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. 
 अरबिंडो कंपनीला कोल ब्लॉग मिळाल्याने ही कंपनी चालू करण्यासाठी त्यांच्या हालचाली चालू झाल्या आहे टाकळी - बेलोरा येथील गट ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांना विश्वासात घेऊन त्यांच्या लेटर पॅड वरील परवानगीने अरबिंडो कंपनीने गावातील नागरिकांना कोणतीही माहिती न देता भूसंपादन बाबत संपूर्ण  अटी मान्य असल्याबाबतचे पत्र इंग्रजीमध्ये देऊन सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रकार चालू केला होता. हा फसवणुकीचा प्रकार हाणून पाडला नंतर संपूर्ण गावकरी एकत्र आले असून या प्रकाराबाबत पोलीस स्टेशन भद्रावती येथे तक्रार दाखल करण्यात आली. अश्या फसवणूक करणाऱ्या कंपनीला ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये तसेच गावातील कोणतीही जमीन देण्यास विरोध दर्शविला असून याबाबतचे निवेदन तहसीलदार निलेश खटके यांना देण्यात आले. यावेळी आकाश वानखेडे, रितेश सातपुते, सतीश सातपुते, मनोज मत्ते, प्रवीण मत्ते, गणेश पंडीले,संजीवन जगताप, दादाजी देहारकर, सुभाष मत्ते सह शेकडो गावकरी उपस्थीत होते .