२१ वार्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ सप्टेंबर २०२१

२१ वार्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्याशिरीष उगे वरोरा/प्रतिनिधी
:- वरोरा शहरातील खांजी वार्डातील एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या आत्महत्या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
         अधिक माहितीनुसार घरी कोणीच नसल्याचे पाहून खांजी वार्डातील २१ वर्षीय तरुणीने दुपारच्या सुमारास घरातील वरच्या खोलीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. काही दिवसांपूर्वी तिचे लग्न जुळल्याचे कळते. वडील घरी आल्यानंतर दार उघडत नव्हते दरवाजा तोडून खोली मध्ये बघितले असता मुलीचा गळफास घेतल्याने जागीच मृत्यू झाला असल्याचे कळाल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान तरुणीने मृत्युपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी खोलीत आढळून आली असून ती पोलिसांच्या हाती लागली असल्याचे कळते. चिठ्ठी मध्ये कारण काही नाही बाबा, आई व भावाकडे लक्ष द्या असा मजकूर असल्याचेही कळते. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक वरोरा तपास पोलीस करत आहेत.