हतनूर येथील राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थांचे घवघवीत यश. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ सप्टेंबर २०२१

हतनूर येथील राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थांचे घवघवीत यश.

औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्मानशास्त्र वार्षिक उन्हाळी परीक्षेचा निकाल 31 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून यामध्ये राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी  (औषधनिर्मानशास्त्र) महाविद्यालय हतनूरचा निकाल 100% लागला असून, महाविद्यालयाच्या औषधनिर्मानशास्त्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये बोरसे कावेरी छत्रपती-92.73% मार्क घेऊन महाविद्यालयातून  प्रथम, बोरसे निर्जला संजय-90.64% मार्क घेऊन द्वितीय, काळे ऋषिकेश तुळशीराम-87.46% मार्क घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट श्रेणी मध्ये पास झालेल्या विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील व सचिव अर्जुन पाटील प्राचार्य डॉ. खनगे एस. जी., प्रा. जाहेद सय्यद विभाग प्रमुख, प्रा. सुरेश वाघमारे, प्रा. हेमांगी सोनवणे, प्रा. मनोज गरड, प्रा. हर्षदा निकम प्रा. सुलेमान शेख, प्रा. प्रवीण अकोलकर, ग्रंथपाल दिपक भगुरे, अधिक्षक किरण शिंदे, जितेंद्र कलांसे, प्रियंका लांडे, गणेश कुल्हाळ, विजय कटके, रवींद्र गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले.